Advertisement 300 X 250

माझ्याबद्दल


मायनारायणगाव चा इतिहास आणि मी
नमस्कार मंडळी
प्रथम आपल्या सर्वाचे आपल्या लाडक्या मायनारायणगाव.इन कडून मनपूर्वक स्वागत!
खूप दिवसापासून मनात येत होत आपल्या गावाची ओळख सातासमुद्रापलीकडे पलीकडे जावी कारण आपल्या गावाला एक इतिहास आहे.मित्रांनो मी दत्तात्रय विठ्ठल आवारे ,रा.नारायणगाव (खेरवाडी मध्य.रेल्वे )महाराष्ट्र.
मायनारायणगाव.इन ही वेबसाईट एक वर्षापासून सुरु आहे.त्यावरील माहिती सेवा सन २०१० द्राक्ष सिझन पासून सुरु केली.ही वेबसाईट सुरु करतांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायद्याचा विचार मी केला नव्हता या साईटवरील सर्व माहिती अगदी पूर्ण पणे मोफत आहे.
येत्या ऑक्टोबरमध्ये माहिती सेवेला एक वर्षे पूर्ण होत आहे.मागील एक वर्षात रसिक वाचकांनी आपल्या साईटवर खूप प्रेम केले,सन २०१० ते २०११ या कालावधीत सुमारे ९६ देशांमध्ये ३ लाख २२ हजार लोकांनी साईट पहिली.माझ्या बद्दल सांगण्यासारखे तसे काही नाही ,माझे नाव दत्तात्रय विठ्ठल आवारे मी एका शेतकरी कुटुंबातील असून मी नाशिक मधील नारायणगाव या गावी राहतो.लहानपणी आमच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. माझे बालपण अक्षरश: झोपडीमध्ये राहून गेले आहे.शैक्षणिक बाबतीत म्हणाल तर मी काही फार मोठा इंजिनीअर किंवा फार मोठी डिग्री मिळवलेली नाही.पण लहानपणापासून मला फोटोग्राफी करण्याची आवड असल्याने अर्थात माझे शिक्षणच फोटोग्राफी व्यवसायामुळे झाले.
१९९५ मध्ये एम ए पदवी घेतल्या नंतर मी वेबडिझाईन करू लागलो.संपूर्ण फोटोग्राफी व्यवसायत झोकून घेतले मग जस जग बदलत चालले तसे व्यवसायात बदल करावा लागला आणि डिजीटल फोटोग्राफी
चा जमाना सुरु झाला.त्या काळात वेब डिझाईनला फारसा स्कोप नव्हता महिन्यात फार तर एक वेबसाईट मी करून देत असे.परंतु आमचा मुख्य व्यवसाय द्राक्ष शेती असल्याने मला शेती सोडून या व्यवसायाला संपूर्ण वेळ देता येत नाही.माझ्या द्राक्षशेती विषयी संकेतस्थळावर निश्चित भेट द्या.www.nashikgrapes.in म्हणून मी आज फोटोग्राफी व्यवसाय बंद करून फक्त द्राक्ष शेती आणि फावल्या वेळात वेब डिझाईन करणे हा माझा छंद,म्हणून जोपासला.आज मी उत्कृष्ठपणे मी वेबसाईट वेबडिझाईन रजिस्टर पासून तर संपूर्ण कामे करून देतो.
संचालक
दत्तात्रय आवारे
मायनारायणगाव.इन


 


 
 

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More