ई-चावडी
ई-चावडी या नावामागील उद्देश असा पूर्वीच्या काळी आपले विचार ,मत ,माहिती व चर्चा करण्यासाठी गावात एकच ठिकाण असायचे ते म्हणजे ' गावची चावडी ' मात्र आता गावातील अनेक लोक आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने किंवा नोकरी निमित्ताने गाव सोडून परदेसी राहतात.परंतु त्यांना आपल्या गावात सध्या काय परिस्थीती चालू असेल .याची चर्चा करण्यासाठी इंटरनेटवरून गावाच्या संपर्कात राहण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी ई-चावडी... आपण चर्चा इंटरनेटच्या माध्यमातून आमच्याशी करावी.या उद्देशाने तुमच्यासाठी ही ई-चावडी खुली ....
|
तात्या होणार लॅपटॉपधार |
महाफेरफार अदालतच्या उद्घाटनप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची घोषणा महसूलशी संबधित सर्वसामान्यांच्या अडचणी तातडीने दूर व्हाव्यात यासाठी राज्य शासनाच्यावतीने सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबविण्यात येत असून यापुढील काळात कुठल्याही फेरफाराची नोंद महिण्यापेक्षा जास्त राहणार नाही. सात-बाराचा उतारा हा सर्वात महत्वाचा असल्याने यापुढील काळात त्याच्यावरच लक्ष केद्रिंत करण्यात आले असून राज्यातील सर्व तलाठ्यांना लॅपटॉप देऊन ‘ई-चावडी’ प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या महाफेरफार अदालतीचे आज (दि.३०) तहसिल कार्यालयाच्या नुतन इमारतीत ना.थोरात यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शेतकर्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या असलेल्या सात बाराच्या उतार्यावर त्यामुळेच लक्ष केंद्रित केले असल्याचे ना. थोरात म्हणाले. सात बाराचा उतारा सहज, वेळेवर मिळायला हवा याविचाराने हे अभियान राबविण्यात येत असून पुढील काळात राज्यातील सर्व तलाठ्यंाना लॅप-टॉप देऊन ई-चावडी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.नांदेड जिल्ह्यात प्रत्येक सजात ई-सेवेच्या माध्यमातून ई-सेवा केंद्र उभारण्यात आली. या केंद्रावर १२१ प्रकारचे दाखले देण्यात येत आहेत. सेवा केंद्राचा संचालक सर्व कागदपत्र गोळा करुन तहसिलला जमा करेल व संगणकावर त्याची नोंद करुन तहसिलच्या माध्यमातून केंद्रावरच दाखले देईल. त्यात सात-बाराचा उताराही देण्याचा विचार आहे. सात-बारावरील फेरफारीच्या नोंदी हा सर्वात कळीचा मुद्दा असून या नोंदी वेळेवर करण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येत आहे. त्यासाठीच ही अदालत भरविण्यात आली असून यापूढे अशी अदालत न भरवता थेट एखाद्या सजात जाऊन नोंदी तपासण्यात येतील. |